3G साठी 17 हजार कोटींची बोली

May 19, 2010 12:28 PM0 commentsViews: 20

19 मे

गेले 34 दिवस सुरू असलेली 3G साठीची बोली संपली आहे. या लिलावामध्ये देशभरातील लायसन्सेससाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

सरकारला या लिलावातून 35 हजार कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात सरकारला 70 हजार कोटींचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

3 G स्पेक्ट्रमच्या या लिलावात रिलायन्सला एकूण 13 सर्कलचे अधिकार मिळाले आहेत. त्यासाठी त्यांनी 8 हजार 585 कोटी रुपये मोजले आहेत.

महाराष्ट्र सर्कलसाठीचे स्पेक्ट्रम टाटा, आयडिया आणि वोडाफोनला मिळाले आहेत. तर आयडीया कंपनीला 11 सर्कलची लायसन्स मिळाली आहेत.

वोडाफोनला 9 तर भारतीला 13 सर्कल्ससाठी लायसन्स मिळाली आहेत. मुंबई आणि दिल्लीसाठीचे अधिकार रिलायन्स, व्होडाफोन आणि भारती एअरटेलला मिळाले आहेत.

3G च्या या लिलावांनंतर आता दोनच दिवसांत ब्रॉडबँड वायमॅक्सची बोली सुरू करण्यात येणार आहे.