आजारी भुजबळ हॅास्पिटलमध्ये मारताय फेरफटका, व्हिडिओ व्हायरल

December 30, 2016 7:14 PM0 commentsViews:

bhujbal_hospital30 डिसेंबर : आजारपणाचे कारण सांगून बॅाम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले माजी सामाजिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आरामात फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लीप बाहेर आलीय.  या क्लीप मध्ये बाॅम्बे हाॅस्पिटलच्या १३ व्या मजल्यावर पांढरी दाढी वाढवलेली अंगावर शाल आणि पांढ-या कुर्ता पायजम्यात छगन भुजबळ आरामात हाॅस्पिटच्या काॅरीडोअर मध्ये फिरताना दिसताहेत.

तब्बल ३५ पेक्षा जास्त दिवस छगन भुजबळ यांनी बाॅम्बे हाॅस्पिटल मध्ये मुक्काम केला होते. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात तक्रार देखील केली होती. छगन भुजबळ हे आरामात राहतायेत त्यांना अनेक राजकीय मंडळी भेटायला येतायेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.  आपल्या या आरोपांना सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून त्यांनी ही सीडी कोर्टात सादर केलीय.

धक्कादायक म्हणजे भुजबळांना जे जे मधून कोणच्या सांगण्यावरून बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते हा आता संशोधनाचा विषय ठरलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close