#फ्लॅशबॅक2016 : किक्रेट जगतात ‘या’ खेळाडूंनी गाजवलं वर्ष !

December 30, 2016 9:38 PM0 commentsViews:

Britain Cricket - England v Pakistan - First Test - Lord’s - 17/7/16
Pakistan's Mohammad Amir and teammates celebrate winning the first test
Action Images via Reuters / Andrew Boyers
Livepic
EDITORIAL USE ONLY.
2016 हे वर्ष  क्रीडा जगतासाठी फार भरभराटीचं ठरलंय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी नवे रेकॅार्ड प्रस्तापित केले. क्रिकेटमधील काही महत्त्वाच्या घडामोडी ज्यांनी सगळ्यांकडून कौतूक मिळवलं. काही खेळाडू ज्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली.

1.विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाने न्युझीलंडवर क्लिन स्वीप मिळवला. इंदौर येथील तिसऱ्या कसोटी जिंकून 3-0 अशी मालिका जिंकली. या विजयानंतर संघ आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमाकांवर आला.  माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हातून विराटला चांदीची गदा देण्यात आली .

2.ईडन गार्डन येथील टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने 155 धावा उभ्या केल्या. वेस्ट इंडीजच्या हातून सामना निसटत असताना क्लार्स ब्रेथवेट याने शेवटच्या षटकात चार चौकार ठोकला. अश्याप्रकारे सामना चमत्काकिरित्या खेचून आणून संघ ‘चॅम्पियन’ ठरला. वन-डे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप तर महिला वर्ल्डकप
जिंकून त्यांनी जगभरातील टीकाकारंची तोंड बंद केली .

3. बांग्लादेशविरुद्ध एशिया कप फायनलमध्ये कर्णधार एमएस धोनीने चौदाव्या षटकात त्याच्या स्टाईलमध्ये हेलिकॉप्टर शॉट लगावून विजय मिळवला. या विजयानंतर भारत सर्वाधिक म्हणजे 6  वेळा एशिया कप जिंकणारा देश ठरला.

4. विराट कोहलीसाठी हे वर्ष फारच भरभराटीच ठरलं. त्याने या वर्षात 3 डबल सेंच्युरी झळकावल्या. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिली (200) आणि न्युझीलंडविरुध्द ऑक्टोबरमध्ये दुसरी (211)  डबल सेंच्युरी त्याने लगावली. यानंतर त्याने तिसरी डबल सेंच्युरी (235)  मुंबईत इंग्लंडविरुद्ध डिसेबरमध्ये ठोकली.

5. करुण नायरने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये 381 बॉलमध्ये 303 धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 32 चौकार तर 4 षटकार लगावले. विरेंद्र सेहवागनंतर ट्रीपल सेंच्युरी झळकवणारा दुसरा भारतीय बॅट्समन ठरला.

6. न्युझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54 बॉलमध्ये आपले शतक ठोकलं. त्याने मिस्बाह उल हकच्या 56 बॉलमधील वेगवान शतकाचा रेकॉर्ड मोडला.

7.पाकिस्तानी क्रिकेटर मिस्बाह उल हकने जुलै महिन्यात इंग्लंडविरुध्द त्याची पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली . हा आनंद साजरा करण्यासाठी त्याने पुश-अप्स मारायला सुरुवात केली . हीच पध्दत नंतर पाकिस्तानी टीमने लॉर्ड कसोटी जिंकल्यावर आनंद व्यक्त करायला वापरली.

8. मोहम्मद आमिरने पाच वर्षाच्या आंतराराष्ट्रीय बंदीनंतर आस्ट्रेलियाविरुद्ध कमबॅक केले. या सामन्यात त्याने 10 विकेट मिळवले.

9. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या होबार्ट कसोटीत साऊथ आफ्रिकेच्या फॅफ डु प्लेसिसवर बॉल टेंपरिंगचा आरोप लावण्यात आला. त्याने हे आरोप नाकारल्यानंतरही आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली.

10. ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्याची  मालिका 5-0  असा एकहाती जिंकली. त्यात पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 371 धावा बनवल्या. बदल्यात विरोधी संघाने चार विकेट राखून विजय मिळवला. ज्यात डेव्हिड मिलरच्या 118 धावांच्या खेळीचा समावेश होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close