दिलदार सचिन…

May 19, 2010 3:35 PM0 commentsViews: 2

19 मे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दिलदार स्वभावाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

लहानपणी एकत्र क्रिकेट खेळलेल्या एका मित्राच्या शस्त्रक्रियेचा खर्च सचिनने उचलला आहे. दलबीर सिंग असे सचिनच्या या क्रिकेटर मित्राचे नाव आहे.

17 वर्षांखालच्या गटात दलबीर आणि सचिन पश्चिम विभागाच्या टीममध्ये एकत्र खेळले होते.

2002मध्ये दलबीरला एक मोठा अपघात झाला. आणि त्यानंतर आठ महिने तो कोमात होता.

त्याच्या पायावर महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्याच्या आईने सचिनला पत्र लिहून मदत मागितली. आणि सचिननेही तत्काळ मदतीचा हात पुढे केला…

ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर दलबीर आपल्या पायावर उभा राहू शकेल.

close