LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

December 31, 2016 1:55 PM0 commentsViews:

modi342331 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान काळ्या पैशांविरोधातील लढाई आणि नोटाबंदीसंबंधित काही मोठ्या घोषणा करु शकतात. नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली.. नोटाबंदीबाबत त्यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती. परंतु 50 दिवस उलटल्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे नोटाबंदीची डेडलाईन संपल्याने मोदी आज काय बोलणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close