बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन

December 31, 2016 2:30 PM0 commentsViews:

balasaheb_vikh431 डिसेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर लोणी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  प्रवरानगर इथल्या साखर कारखाना प्रांगणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

काल शुक्रवारी लोणी प्रवरामधल्या राहत्या घरी विखे पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेब विखे पाटील यांचं सहकार क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे. त्यांचे वडील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातल्या लोणीमध्ये सहकारी साखर कारखाना सुरू केला. हा आशियातला पहिला साखर कारखाना होता. बाळासाहेब विखे पाटील यांनी ही सहकाराची परंपरा सुरू ठेवली. केंद्रात अर्थराज्यमंत्री असताना बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागासाठी ७५ हजार कोटींची तरतूद केली होती. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील यांचा मुलगा आहेत.   बाळासाहेब विखे पाटील हे १९८१ ते १९८४ या काळात राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते २५ वर्षांपासून अध्यक्ष होते.

बाळासाहेबांचे सुपूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही बंधु , भगिनी सर्व परीवार याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या  घरापासून अंत्ययात्रेला सुरूवात झाली आणि पाच किमीवर असणाऱ्या प्रवरानगर साखर कारखाना येथील प्रांगणात बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांसह मोठा जनसागर या अंत्यविधीत सहभागी झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close