‘सपा’तील ‘दंगल’ संपुष्टात, अखिलेश यादवांचं निलंबन मागे

December 31, 2016 3:12 PM0 commentsViews:

akhilesh_mulyam_sp31 डिसेंबर : समाजवादी पक्षामध्ये सुरू असलेली ‘दंगल’ अखेर संपुष्टात आलीये. अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव आणि त्यांचे समर्थक रामपाल यादव यांचं निलंबन मागे घेतलंय.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात काल मोठा भूकंप घडला.  मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं निलंबन रद्द करण्यात आलंय. आज सकाळी सपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तिथे त्यांच्यात उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीमध्ये अखिलेश यांच्या सर्व अटी मान्य करण्यात आल्या आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये. रामगोपाल यादव उद्या अधिवेशनात विशेष प्रस्ताव मांडणार आहे. सर्व एकत्र राहुन पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत सपाला पूर्ण बहुमत मिळवून देणार असा विश्वास मुलायम सिंह यादव यांनी व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close