लाखभर भाकरी, 35 कढय्या आमटी ; जुन्नरमध्ये यात्रेचा महाप्रसाद !

December 31, 2016 5:06 PM0 commentsViews:

31 डिसेंबर : सुमारे लाखभर बाजरीच्या भाकरी आणि ३५ पेक्षा जास्त जंबो कढईमधील लज्जतदार गरमागरम आमटी… या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आणे इथं भाविकांची झुंबड उडाली आहे. इथलं ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चविष्ट चवदार आमटी- भाकरीची सुमारे १५० वर्षांपासूनची परंपरा आहे.

शुक्रवारपासून सुरु झालेली ही यात्रा ३ दिवस चालते. इथं वाजतंगाजत  भाकरीची मिरवणूक काढण्याची एक आगळी-वेगळी प्रथा या गावात पाहायला मिळते. गावच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून बाजरीच्या भाकरी जमा केल्या जातात. जमा झालेल्या भाकारींची वाजत-गाजत मिरवणूकही काढली जाते. सारं गावच या कामासाठी सरसावतं. या आमटी आणि भाकरीची चव दुसरीकडं कुठच मिळत नाही असं प्रसाद खाणारे आवर्जून सांगतात. प्रत्येकवर्षी आमटीसाठी लागणारं साहित्याचा खर्च परिसरातील दानशूर अन्नदाते करतात.

junnar_bhakariआमटीचा खर्च करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ असते. यात्रेच्या या दोन दिवसांत गावच्या पंचक्रोशीत घरी जेवण बनवलंच जात नाही. कामानिमित्त बाहेरगावी राहणारे,शिकले सवरलेले,एरवी जेवता-खाताना नियम पाळणारेही इथं पंगतीला बसतात. ताटात भाकरी चुरून त्यावर गरमा-गरम आमटी ओततात आणि भुरका मारत प्रसाद घेतात. कारण गावच्या यात्रेत पसाद घेण्याची हीच पद्धत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close