2017 मध्ये काय मिळेल ?

December 31, 2016 5:32 PM0 commentsViews:

2017_year31 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप दिला जातो आणि नव्या वर्षाचे संकल्प केले जात आहे. नव्या वर्षाकडून साहजिकच नव्या अपेक्षा ठेवल्या जात आहे. त्यामुळे या वर्षात आपल्या पदरी काय पडणार याचा आम्ही आढावा घेतलाय.

नव्या वर्षात गरिब रथ समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या रिकाम्या तिकिटांवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाणार आहे. तसंच लहान शहरांमध्ये स्वस्त विमान प्रवासाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.  बहुचर्चित जीएसटी विधेयक मंजूर झाले आहे.  1 एप्रिल ते 16 सप्टेंबरदम्यान हे विधेयक लागू होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील.  घर, कपडे,लहान कार, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, फर्निचर स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे देशभरात एकच टॅक्स लागू असणार आहे. इतर सर्व टॅक्सेस रद्द होणार आहे. त्यामुळे सोळावं वरीस सरलं असून सतरावं नक्की फायद्याचं ठरणार आहे.

2017 मध्ये काय मिळेल ?

- आधार इनेबल्ड अॅप पेमेंट सिस्टीममुळे डेबीट किंवा
क्रेडीट कार्डशिवाय पेमेंट करता येईल

- जानेवारीपासून छोट्या शहरांत विमानप्रवासाची सुरुवात होईल.
एक तासापेक्षा कमी वेळाचा विमानप्रवास
- 2500 रुपयांत बिकानेर, जेसलमेर, भावनगर
जामनगर, भटिंडा, पठाणकोट
अलाहाबाद लखीमपूर आणि जोरहाट

-1 जानेवारीपासून मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेमध्ये
- रिकाम्या सीटवर 10 टक्के सवलत मिळेल 12 रेल्वेंमध्ये ही सलवत मिळणार आहे.
- शताब्दी, राजधानी, दुरंतो एक्स्प्रेसच्या 142
रेल्वेंमध्ये फ्लेक्सी फेयरनुसार 10 टक्के डिस्काऊंट

- जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू होतील स्वस्त
- 1 एप्रिल ते 16 सप्टेंबरदम्यान लागू होणार
-  घर, कपडे,लहान कार, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, फर्निचर

- पासपोर्ट नियम शिथिल होणार. डेट ऑफ बर्थसाठी
बर्थख सर्टिफिकेटचा नियम सरकारने शिथिल केला

- गावांतही पासपोर्ट मिळेल
- मार्चपर्यंत 5 गावांत स्मॉल सव्हीस सेंटर सुरु होतील.
- डिसेंबरपर्यंत 50 सेंटर सुरु होतील.

- 1075 या टोल फ्री क्रमांकावर डॉक्टरांचा सल्ला
घेता येईल. त्यासाठी केंद्राने टेंडर प्रोसेस सुरू केली आहे.

- पोस्ट ऑफिस बनतील बँक
-मार्चपासून सुमारे 650 पोस्ट ऑफिसेसमध्ये सुविधा सुरू होणार

-सिनियर सिटिझन्सना रेल्वेच्या रिझर्व्हेशनमध्ये
कन्सेशनसाठी आधार द्यावे लागेल.

- पगार रोख मिळणार नाही. बँकेच्या अकाऊंटद्वारे किंवा
चेकद्वारे पगार द्यावा लागेल. त्यासाठी ऑडिर्नसला
परवानगीही मिळाली आहे.

- मुंबई – दिल्ली दरम्यान स्पेनची वजनाने हलके कोट
असणारी टॅल्गे ट्रेन मार्चपासून सुरू होईल

- देशभरातील मेडिकल कॉलेजेसमध्ये पीजीच्या कोर्स प्रवेशासाठी एकच NEET परीक्षा होईल

- रेल्वेमध्ये जर्मन LLB कोच हे भारतातच
तयार केले जात आहे. 2017 मध्ये याच्या
उत्पादनाचा वेग वाढवला जाईल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close