मल्लिका अजगराच्या प्रेमात

May 19, 2010 4:57 PM0 commentsViews: 44

19 मे

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत कोणाशी रोमान्स करेल याचा काही नेम नाही… सध्या मल्लिका कुठल्याही व्यक्तिच्या नाही तर चक्क अजगराच्या प्रेमात पडली आहे.

जेनिफर लिंचच्या हिस या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मल्लिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहचली.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील मल्लिका कान्सच्या रेड कार्पेटवर आली तीच मुळी आपल्या मानेवर अजगर घेऊनच.

तिचे हे अनोखे प्रमोशन आणि अजगरावरचे तिचं प्रेम पाहून फेस्टिव्हलला आलेले प्रेक्षकही अवाक् झाले.