पंतप्रधान मोदींकडून सर्वसामान्यांना नववर्षाची भेट, या आहेत मोठ्या घोषणा

December 31, 2016 8:30 PM0 commentsViews:

modi3

31 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला सर्वसामान्यांना दिलासा देत नववर्षाची भेट दिलीये. सर्वसामान्यांनाच घरं घेण्याचं स्वप्न साकारण्यासाठी मोदी सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय.  पंतप्रधान आवास योजनेचा विस्तार केलाय. तसंच लघूउद्योजक, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या घोषणा केल्या आहेत.

 

- लाखो लोकांना घरे नाहीत,प्रधानमंत्री आवास योजनेत, गरीब वर्गाना घर देण्यासाठी नव्या योजना -पंतप्रधान मोदी

- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 33 टक्के जास्त घरं बांधणार – पंतप्रधान मोदी

- 2017 मध्ये गावातील लोकांना घर बांधायचं असेल, त्यांना 2 लाख रुपये कर्जात, 3 टक्के सूट देणार -पंतप्रधान मोदी

-  9 लाख रुपयाच्या गृहकर्जावर 4 टक्के सूट -पंतप्रधान मोदी

- 12 लाख रुपयाच्या गृहकर्जावर 3 टक्के सूट -पंतप्रधान मोदी

- गावात घर बांधण्यासाठी, 2 लाख रुपये कर्जामध्ये 3 टक्के सूट -पंतप्रधान मोदी

- लघू व्यावसिकांना 2 कोटीचा व्यवसाय केलेल्या व्यापाऱ्यांच्या डिजीटल टॅक्स, 6 टक्के उत्पन्न समजून वसूल करणार -पंतप्रधान मोदी

- लघू व्यावसायिकांना जास्त कर्ज मिळेल, व्याजदरही कमी असणार – पंतप्रधान मोदी

- लघू उद्योजकांना कॅश क्रेडीट मर्यादा 20 पासून 25 टक्यांवर करणार -पंतप्रधान मोदी

- लघू व्यावसिकांसाठी कर्जासाठी सरकारी क्रेडीट गँरटी 1 कोटीहून 2 कोटीपर्यंत -पंतप्रधान मोदी

- किसान क्रेडीट कार्डाच रुपांतर रुपया कार्डात करणार, शेतकरी खरेदी, विक्री करु शकतील -पंतप्रधान मोदी

- जेष्ठ नागरिकांसाठी – साडे सात लाखाच्या डिपॅाझिटवर 8 टक्के व्याजदर  आणि प्रत्येक महिन्यात त्यांना व्याज मिळणार -पंतप्रधान मोदी

- गर्भवती मातांसाठी देशाच्या सर्व जिल्हात,सरकारी रुग्णालयात, उपचाराला 6 हजार रुपये देणार – पंतप्रधान मोदी

- गर्भवती मातांना 6 हजार रुपये मिळणार आणि ते थेट खात्यात जमा करणार -पंतप्रधान मोदी

- 3 कोटी किसान क्रेडीट कार्डाचं, रुपया कार्डात बदलणार -पंतप्रधान मोदी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close