थर्टी फर्स्ट टाळून सयाजी शिंदेंचं झाडांसाठी श्रमदान

December 31, 2016 9:50 PM0 commentsViews:

sayaji_shinde31 डिसेंबर : नववर्ष साजरा करताना बहुतांश लोकं पार्ट्या झोडतात. पण अभिनेता सयाजी शिंदे याला अपवाद ठरलाय. सयाजी शिंदेनं दुष्काळी माण तालुक्यातल्या दिवडी गावाच्या शिवारात लावलेल्या आठ हजार झाडांसाठी श्रमदान केलं.

सयाजी शिंदे सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. या संस्थेनं जून महिन्यात आठ हजार झाडं लावली होती. ही झाडं ज्या ठिकाणी लावण्यात आली होती. त्या ठिकाणी परिसरातल्या तरुणांनी आणि शाळकरी मुलांनी एकत्र येत वृक्षारोपण केलेल्या माळरानावर श्रमदान केलं. लावलेल्या आठ हजार रोपट्य़ांच्या भोवती आळी तयार करण्यात आली. परिसरातलं गवत काढण्यात आलं. फक्त वृक्षारोपण करुन इथली तरुणाई थांबली नाही तर त्यांची काळजी घेण्याचं कामही इथली तरुणाई करतेय. नवीन वर्षाचं स्वागत करताना पार्टी न करता निसर्गाने केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचं काम केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close