इस्तंबूल हल्ल्यात दोन भारतीयांसह 39 मृत्यूमुखी

January 1, 2017 8:00 PM0 commentsViews:

turky attack

01 जानेवारी: तुर्कीतल्या इस्तांबुलमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून, या भ्याड हल्ल्यात 39 नागरिकांचा मृत्यू, तर 40 नागरिक जखमी झाले आहेत. इस्तंबुल हल्ल्यातल्या मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. अब्बास रिझवी आणि खुशी शहा अशी मृतांची नावं असून अब्बास हे राज्यसभेचे माजी खासदारांचे पुत्र आहेत.

इस्तांबुलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रेना नाईटक्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.पार्टी सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी सांताक्लॉजच्या वेशात येऊन हल्ला केला.

रेना नाईटक्लबमध्ये पार्टीत शेकडो नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हजर होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close