समाजवादी पक्षात वर्चस्वाची लढाई

January 1, 2017 2:23 PM0 commentsViews:

akhilesh_yadav4523

01जानेवारी : नवं वर्ष सुरू झालं तरीही समाजवादी पक्षातील वाद काही संपायचं नाव घेत नाहीयेत.समाजवादी पक्षातील वाद आता विकोपाला गेला असून बाप आणि मुलात आता पक्ष काबीज करण्याची लढाई सुरू झालीये.

आज अखिलेश यांनी लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं होतं.या अधिवेशनातच त्यांनी अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. तर शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. यासोबतच स्वतःची समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून मुलायम यांना मार्गदर्शक पदावर बसवून टाकलं.

मात्र थोड्याच वेळात खुद्द मुलायम यांनीच हे अधिवेशन असंविधानिक असल्याचं जाहीर करून अखिलेश यांना तोंडघशी पाडलं.मात्र एकीकडे पक्षातले वाद कमी करण्यासाठी मुलायम यांनी अखिलेश यांचं निलंबन रद्द करून त्यांना पक्षात पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला खरा,मात्र अखिलेश तेवढ्यावरच समाधान मानतील असं काही वाटत नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close