बनावट नोटा छपाईप्रकरणी नागरेसह 10 जणांना कोर्टात करणार हजर

January 2, 2017 9:12 AM0 commentsViews:

chabu
02 जानेवारी : बनावट नोटा छपाईप्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी छबू नागरे याच्यासह अटकेत असलेल्या 10 संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज (सोमवारी) कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान बनावट नोटा छापणारा आणखी एक संशयित फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

छगन भुजबळांचा निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या छबू नागरेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी छबू नागरेला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून 1 कोटी 36 लाखांच्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

दरम्यान, आज सोमवारी सर्व 11 संशयितांना न्यायालयात हजर केलं जाणार असून, त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.

काय आहे हे प्रकरण?

- छबू नागरे यानं नाशिकच्या खुटवड भागातील एका ब्युटी पार्लरमध्ये बोगस नोटांच्या छपाईचा कारखाना उघडला होता
-या कारखान्यात छबू नागरेनं 1 कोटी 36 लाखांच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा छापल्या होत्या
-छबू नागरेला 200 कोटींच्या बोगस नोटा छापायच्या होत्या तसं छबू नागरेनं टार्गेट ठेवलं होतं
-छबू नागरेनं छापलेल्या नोटा त्याचा साथीदार रामराव पाटील हा नोटा बाजारात वटवण्याचं काम करायचा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close