एसबीआयपाठोपाठ इतर बँकाही व्याजदर कमी करण्याची शक्यता

January 2, 2017 11:38 AM0 commentsViews:

sm-6-home-loan-oct5-1_647_092415060251

02 जानेवारी : स्टेट बँक ऑफ इंडियाने नववर्षाची ग्राहकांना भेट दिली आहे. नोटा बंदीनंतर बँकांत मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने एसबीआयने कर्ज व्याजदरात 0.9 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीपासून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करताना नोटा बंदीनंतर बँकांत मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाल्याने बँकांना त्याचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक ,युनियन बँकेने तसंच आयडीबीआय बँकेने तातडीने अंमलबजावणी करत, व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नव्य वर्षात गृहकर्ज स्वस्त होण्याचे संकेत आहेत.

 कोणत्या बँकेनं व्याजदरात कशी कपात केलीय?

बँक                           आधी              आता

भारतीय स्टेट बँक         8.90%             8.00%

पंजाब नॅशनल बँक        9.15%            8.45%

युनियन बँक                  9.30%             8.65%

आयडीबीआय              9.30%              9.15%


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close