रिलायन्सच्या सेझला विरोध कायम

May 20, 2010 10:51 AM0 commentsViews: 3

20 मे

नवी मुंबईमध्ये कळंबोली आणि द्रोणागिरीमध्ये मिळून एक सेझ होत आहे. पण रिलायन्सच्या या सेझला नागरिकांचा विरोध अजूनही कायम आहे.

टेंभोडे आणि वळवली गावातील नागरिकांच्या जमिनी सिडकोने शहरी वसाहती बांधण्यासाठी संपादित केल्या होत्या. शेतकर्‍यांना मोबदला दिला होता, एकरी 14 हजार.

आता ती जमीन सिडकोने रिलायन्सला जास्त दराने विकली आहे. या दोन्ही गावांभोवती रिलायन्स 350 हेक्टरमध्ये भिंत बांधत आहे.

पण गावकर्‍यांनी त्याला एकजुटीने विरोध केला आहे. सिडकोच्या वसाहती होणार नसतील तर सेझला जमीन देणार नाही, असे गावकर्‍यांनी सांगितले आहे.

close