जाती आणि धर्माच्या नावावर मत मागणं बेकायदेशीर – सुप्रीम कोर्ट

January 2, 2017 1:52 PM0 commentsViews:

Supreme court of india

02 जानेवारी :  जात, धर्म, पंथ किंवा भाषेच्या नावावर मतं मिळवणाऱ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना सुप्रीम कोर्टानं जोरदार दणका दिला आहे. निवडणुकीत धर्माच्या आधारं मतं मागणं बेकायदेशीर असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यंदाच्या वर्षी देशातील 5 महत्त्वाच्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हिंदुत्वाशी संबंधित अनेक लोकांनी कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश टी एस ठाकूर या खंडपीठाच्या अध्यक्षपदी आहेत.

निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष असल्याने, निवडणुकीमध्ये धर्म, जात, समुदाय आणि भाषेच्या आधारे मतं मागणं घटनेच्या विरोधी असल्याचं मत खंडपीठानं नमूद केलं. लोकप्रतिनिधींनीही आपले सर्व काम धर्मनिरपेक्षपणे केलं पाहिजे असंही खंडपीठाने स्पष्ट बजावलं आहे.

दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका होतायेत. त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अधिक महत्त्वाचा आहे. यामुळे आता नेत्यांच्या भाषणावर निवडणूक आयोगाला आणखी जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close