माहिमतुराला पोलीस कोठडी

May 20, 2010 12:17 PM0 commentsViews: 1

20 मे

एक कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हायराईज कमिटीचा सदस्य शैलेश माहिमतुरा याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहिमतुरा सध्या छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहे.

पण माहिमतुरा हा सरकारी कर्मचारी नसल्याने त्याच्याविरुद्ध सरकारी अधिकार्‍याने लाच घेतल्याचे कलम लागू शकत नाही, असायुक्तिवाद केला गेला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध योग्य ते कलम लावावे, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे होते.

पण कोर्टाने खटल्याच्या सुनावणी दरम्यान याचा विचार केला जाईल, असे सांगत सध्या हा युक्तिवाद फेटाळला.

आता पोलिसांना दोन तास माहिमतुराची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच चौकशीदरम्यान त्याच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगीही देण्यात आली आहे.