पिंगळेंचा आणखी एक ‘कार’नामा, 200 कोटींचा लाटला भूखंड ?

January 2, 2017 5:35 PM0 commentsViews:

pingle_402 जानेवारी : बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांची 57 लाखाची रोकड कारमध्ये सापडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नाशिकचे राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळेंचा बाजार समितीत आणखी एक घोटाळा समोर आलाय. पिंगळे याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 200 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचं उघड झालंय.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती. शेतकऱ्याच्या, शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून सरकारनं उभारलेली एक सहकारी यंत्रणा. ही बाजार समिती सांभाळणारे संचालक मंडळही शेतकरी निवडून देतात. या संचालकांना आणि सभापतीला लोकसेवक दर्जा आहे. पण याच लोकसेवकानी बाजारसमितीच्या मालमत्तेचा चक्क आपली खासगी मालमत्ता असल्यासारखा वापर केलाय.

या अहवालात खोटी सरकारी कागदपत्र तयार करून घेतलेलं नियमबाह्य कर्ज,याकरिता सरकारनं दिलेली जमीन,सरकारची कोणतीही परवानगी न घेता तारण ठेवणं, हीच जमीन विकून टाकण्याचा अपहार,करोडो रुपयांची मालमत्ता विकताना रेडिरेकनर दराच्या चक्क 50 टक्के कमी किमतीला विकण्याचा प्रतापही पिंगळे आणी त्यांच्या कंपूनं केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

रेडिरेकनर नुसार 63 कोटी 54 लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका जरी अहवालात असला तरी जवळपास 200 कोटिंची या जागांची बाजारभावाप्रमाणे किंमत आहे.

पण सरकारी अधिकाऱ्यांनी हा अहवाल चक्क दाबून ठेवला. या अहवालाच्या प्रति आयबीएन लोकमतच्या हाती लागल्यात. जाणकारांच्या मते रेडी रेकनरपेक्षा कमी भावानं विकलेल्य़ा या भूखंडाची किंमत दोनशे कोटींच्या घरात होती. या घोटाळ्याला मोठ्या राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close