जेलमध्ये पोलिसाची लाचखोरी स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद

January 2, 2017 6:19 PM0 commentsViews:

02 जानेवारी : ठाण्यातल्या एका तरुणानं स्टिंग ऑपरेशनव्दारे जेलमध्ये सुरू लाचखोरी चव्हाट्यावर आणलीये. जेलमध्ये कैद्यांना भेटण्यासाठी,त्यांना कपडे आणि खाण्यासाठी किंवा औषधापचारासाठी पैसे घेतले जातात असा आरोप केलाय. या तरुणानं  केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस पैसे घेतायेत हे स्पष्ट दिसतंय.thane_sting

ठाणे जेल मध्ये पैशाशिवाय काहीच होत नाही मग ते एखाद्या कैद्याला भेटणे असेल नाहीतर त्याच्या जमिनीचे पेपर्स जमा करणे असेल. ठाण्यातील कळवा भागात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याचा अनुभव आला. वकीलपत्रावर कैद्याची सही घेऊन आणण्यासाठी जेलच्या  महिला कर्मचारी प्रजा चौधरी उघड उघड पैसे मागून स्वीकारत आहेत. नंतर माझ्या मोठ्या अधिकाऱ्यांना देखील पैसे द्यावे लागतात असं प्रजा सांगत आहे. याच प्रजा चौधरी जेल कर्मचाऱ्याने ठाणे जेलचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

हिरालाल जाधव यांनी त्यानंतर या संपूर्ण प्रकाराला न्यायालयामध्ये सादर केलं. ठाणे जेल मधील महिला शिपाई पदावर प्रजा चौधरी काम करत आहेत. या आणि या सारख्या अनेक प्रकरणात कैद्यांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जातात. त्याचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झालाय.  हा प्रकार धक्कादायक असून याची तक्रार ठाणे एसीबी आणि पोलीस महासंचालक एसीबी यांच्याकडे करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close