पुण्यात संभाजी ब्रिगेडनं फोडला राम गणेश गडकरींचा पुतळा

January 3, 2017 8:56 AM0 commentsViews:

PUNE_GADAKARTI

03 जानेवारी : पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडण्यात आला आहे.  छत्रपती संभाजी महाराजांची नाटकातून बदनामी करण्याचा आरोप करत काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास 10 ते 15 जणांनी हा पुतळा हटवला आणि जवळच्या मुठा नदीत पुतळा फेकून दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले यांनी पुतळा फोडत घोषणाबाजी केली.

पुण्यातील जंगली महाराज रोडवरील महानगरापलिकेच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. आचार्य अत्रे यांच्या हस्ते 23 जानेवारी 1962मध्ये या उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांचा पुतळा हटवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र यासंदर्भात कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close