दत्ता सामंतांचा खुनी सापडला

May 20, 2010 1:08 PM0 commentsViews: 98

20 मे

कामगार दत्ता सामंत नेते यांच्या हत्या प्रकरणातील दोषी विजय थोपटे याला पोलिसांनी अटक केली आहे.

थोपटे हा गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.

कामगार नेते दत्ता सामंत यांची मुंबईत हत्या झाल्यानंतर 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्वांना पुण्याच्या येरवडा जेलमधे ठेवण्यात आले होते. यापैकी 4 कैद्यांचे निधन झाले. एक कैदी जेलमधे आहे.

यातील विजय थोपटे हा आरोपी आईच्या आजारपणाच्या कारणामुळे 15 दिवसांकरिता पॅरोलवर 2005मध्ये जेलबाहेर आला. पण त्यानंतर तो गायब झाला होता.

थोपटेकडे एक पिस्तुलही सापडले. थोपटेसोबत गुरू साटम टोळीच्या 3 गँगस्टर्सनाही पकडण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले.

जगन्नाथ जैसवाल ऊर्फ देशमुख अण्णा, संदीप तिवरेकर आणि दिपक पेडणेकर अशी त्यांची नावे आहेत.

close