सलमान-करणच्या सिनेमात अक्षय कुमार

January 3, 2017 10:15 AM0 commentsViews:

akshay-salman-karan johar

03 जानेवारी : सलमान खान आणि करण जोहर एकत्र चित्रपट काढतायेत आणि त्यात प्रमुख भूमिका असणार आहे अक्षय कुमारची.अक्षयनं काल रात्री तिघांचा फोटो ट्विट केला. चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही, त्याचं शूटिंगही सुरू झालेलं नाही.

अक्षयचे या वर्षी अनेक मोठे सिनेमे येतायेत.जॉली एलएलबी 2, टॉयलेट एक प्रेम कथा आणि क्रॅकमध्ये अक्षय झळकणार आहे.

करण जोहर आणि सलमान खान पहिल्यांदाच निर्मितीसाठी एकत्र आलेत. सलमाननं नुकताच फ्रिकी अली या चित्रपटाची निर्मिती केली होती.नवाजुद्दीन सिद्दीकीची यात प्रमुख भूमिका होती.पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close