सायकलसाठी मुलायम सिंह यांच्यापाठोपाठ अखिलेशही निवडणूक आयोगाच्या दारात

January 3, 2017 12:19 PM0 commentsViews:

akhilesh-singh-yadav-010312-ma-22_650_022214103800

03 जानेवारी :   समाजवादी पक्षाच्या दोन गटात मोठे महाभारत झाल्यानंतर आता निवडणूक चिन्ह सायकलसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी मुलायम सिंह निवडणूक चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले होते. त्यानंतर आज अखिलेश यादवनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

पक्षात उद्भवलेल्या यादवीनंतर मुलायम सिंह यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन समाजवादी पक्षामधील सध्या सुरू असलेल्या घटनाक्रमांची माहिती दिली आणि निवडणूक चिन्ह सायकलवर दावा ठोकला. तर मुलायम यांच्यानंतर आता अखिलेश गटाकडून निवडणूक आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे.

समाजवादी पार्टीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी भीती मुलायम यांना आहे. त्यामुळे सायकलवर स्वार होण्यासाठी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढाई सुरु आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close