1 फेब्रुवारीला सादर होणार सर्वसमावेशक बजेट

January 3, 2017 12:41 PM0 commentsViews:

budget_jaitly03 जानेवारी : मोदी सरकारचं पहिलंवहिलं सर्वसमावेशक बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. 31 जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात होणार आहे.
मोदी सरकारने बजेट ‘परीक्षा’ दिल्यानंतर या प्रथेतच बदल घडवून आणले. दरवर्षी रेल्वे आणि अर्थसंकल्प वेगवेगळा सादर होत होता. रेल्वे बजेटमध्ये दरवर्षी नव्या गाड्या, भाडेवाढ, नव्या योजना आणि रेल्वेच्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला गेला. तब्बल 92 वर्ष ही परंपरा कायम होती.
तर अर्थसंकल्पात टॅक्स, स्वस्त-महाग, व्याजदर आणि इतर अन्य गोष्टींचा लेखाजोखा मांडला जात होता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बजेट सादर होत होते. पण आर्थिक वर्षात बजेटची अंमलबजावणी करण्यात उशीर होत होती. त्यामुळे दोन्ही बजेट एकत्र घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यानुसार आता 1 फेब्रुवारीला सर्वसमावेशक बजेट संसदेत सादर होणार आहे. साहजिकच हे बजेट कसं असणार आहे याबद्दल संपूर्ण देशाला याबद्दल उत्सुक्ता असेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close