मेघालयात मुख्यमंत्री-विरोधकांमध्ये रंगली म्युझिकल जुगलबंदी

January 3, 2017 1:13 PM0 commentsViews:

cm-meghalaya

03 जानेवारी :   असं म्हणतात संगीतात लोकांना जवळ आणण्याची ताकद असते, आणि मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्या मुलीच्या लग्नात याची प्रचितीही आली. एरवी सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर आले की आपल्याला उत्सुकता असते की कोण कोणावर काय आरोप करतोय याची.  पण मेघालयमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधक यांच्यामध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा आणि त्यांचे विरोधक डॉ. डोनकुपर रॉय, पॉल लिंगदोह यांची व्यासपीठावर संगीतिक जुगलबंदी रंगली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री संगमा यांनी गायला सुरुवात केली अन् पॉल यांनी देखील त्यांना चांगलीच साथ दिली. त्यामुळे एरवी एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या या दोन्ही नेत्यांची अशी सांगीतिक जुगलबंदी  पाहायला मिळणे अनेकांसाठी पर्वणीच ठरली. मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा स्वत: एक उत्तम गायक आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांचा एक बँडही होता. तर लिंगदोह आणि डोनकुपर रॉय या दोघांनाही संगीताची आवड आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close