या वर्षात येणार हे धमाकेदार गॅजेट्स

January 3, 2017 2:07 PM0 commentsViews:

..

येत्या वर्षात आपल्या भेटीला येताहेत जबरदस्त गॅजेट्स. ज्यांच्यामुळे तुमचा मनोरंजनाचा अनुभव होणारे जास्त आनंद देणारा. पाहुयात काही गॅजेट्स जी या वर्षात भारतीय बाजारपेठात उपलब्ध होतील.

1. यात सर्वात आधी नाव येतं माइक्रोसॉफ्ट होलोलेंसचं. माइक्रोसॉफ्ट होलोलेंसद्वारे वर्चुअल रियल्टीचा एक समृद्ध अनुभव देणारे ठरेल. मार्केटिंगपासून ट्रेनिंगपर्यंत हे उपयोगात आणता येईल.  (फोटो साभार माइक्रोसॉफ्ट डॉट कॉम)

2.माइक्रोसॉफ्ट सरफेस स्मार्टफोनचा मेमरी स्टोरेज वाढवून ते 500 जीबी केले जाईल. माइक्रोसॉफ्ट सरफेस स्मार्टफोनमध्ये 8जीबी रॅम असेल. हा  3 वेगवेगळ्या प्रकारात लाँच होईल. यात इंटरप्राईज कंज्यूमर्ससाठी काही खास फिचर्स असतील.

3. मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S8  लाँच केला जाऊ शकतो.  सॅमसंग गॅलेक्सी S8 चे डिजाइन वॉटरप्रूफ असेल.  यातही इंटरप्राईज कंज्यूमर्ससाठी खास फीचर्स असतील. (फोटो- सॅमसंग गॅलेक्सी 8 एज डॉट कॉम)

4. नोकिया डी1सी हा नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन असेल. या फोनसोबत नोकिया आपलं साम्राज्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करतोय.

5.गूगल पिक्सल 2 हा आधीच्या गूगल पिक्सलपेक्षा नक्कीच सरस असेल आणि अॅडव्हान्स असेल. गूगल पिक्सल 2  हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असेल.यात एंड्रॉयड O कम्पैटिबिलिटी असेल.

6.उपलब्ध माहितीनुसार आयफोनच्या दहाव्या फोनमध्ये तीन व्हरायटी असतील.  तसंच याला व्हायरलेस चार्जिंग असेल आणि इनविजिबल होम बटन असेल. (फोटो-गेट्टी इमेज)

7.निनटेंडो स्विचने गेमिंगचा अनुभव आणखी समृध्द केला जाईल. (फोटो-निनटेंडो स्विच डॉट कॉम)

8. मायक्रोसॉफ्ट कॉर्टाना स्मार्ट स्पीकरने आपण वॉईस कमांड देऊ शकतो.मायक्रोसॉफ्ट कॉर्टाना हा गूगल होम आणि अॅमेजॉन एलेक्साला मोठी टक्कर देऊ शकतो.(फोटो-मायक्रोसॉफ्ट डॉट कॉम)

9.प्रोजेक्ट स्कॉर्पियो 4K ग्राफिक्ससोबत यावर्षी बाजारात येईल. यावर गेमिंगची मजा काही औरच असेल.गेमर्ससाठी हे गॅजेट विशेष पर्वणी ठरेल.(फोटो-मायक्रोसॉफ्ट डॉट कॉम)

10. पुन्हा एकदा 2017मध्ये गॉड ऑफ वॉर गेम आपले वेड लावणार आहे. हा  प्लेस्टेशन 4 वर एक्सक्लूसिवली उपलब्ध होईल. (फोटो-गॉड ऑफ वॉर डॉट कॉम)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close