सावित्रीबाईंच्या विचारांना नवी मुंबई पालिकेची तिलांजली

January 3, 2017 2:53 PM0 commentsViews:

03 जानेवारी : आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिन. महिला शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाईंच्या या जयंती दिनी राज्यभर अनेक कार्यक्रम साजरे होताहेत. मात्र नव्या युगाचं शहर असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेनं या दिवशी अगदीच बाळबोध स्पर्धाचं आयोजन केलंय.

चुल, मुल या संकल्पनेतून महिलांना बाहेर काढणाऱ्या सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी पालिकेनं महिलांसाठी पाककला, सॅलेड, टाकाऊपासून टिकाऊ, रांगोळी स्पर्धा यांचं खास आयोजन केलंय. एरवी मोठ्या मोठ्या इमारतीच्या पाडकामाची नोटीस बजावण्यासाठी तासाचाही अवधी न घेणाऱ्या पालिका आय़ुक्तांना मात्र या आयोजनात काहीच आक्षेपार्ह वाटलं नाही.

महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून हीच संकल्पना पालिका राबवत आहे. सावित्रीच्या विचारांना तिलाजंली देण्याचं काम पालिका करत आहे अशी टीका काँग्रेस, शिवसेनेनं केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close