कबीर कला मंचाचे सचिन माळी यांना जामीन मंजूर

January 3, 2017 3:02 PM0 commentsViews:

sachin_mali_03 जानेवारी : कबीर कला मंचाचे सचिन माळी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.  माओवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोपावरून सचिन माळी गेल्या चार वर्षांपासून तुरुंगातच होते.

सचिन माळी आणि शीतल साठे कबीर कला मंचचे कार्यकर्ते आहे. कबीर कला मंचचे काही तरुण माओवादी  चळवळीत सक्रीय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सचिन माळी, शीतल साठे आणि अन्य काही तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून फरार असलेल्या या तरुणांनी एप्रिल २०१३ ला मंत्रालयासमोर आंदोलन करून स्वत:ला अटक करून घेतली होती. यापैकी शीतल साठेची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर आज  सचिन माळी,सागर गोडखे आणि रमेश गायतोर यांची जामिनावर सुटका केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close