मुंबै बँकेला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला 1 लाखांचा दंड

January 3, 2017 3:12 PM0 commentsViews:

mumbai_Bank03 जानेवारी : केवायसीचं नियम न पाळल्याबद्दल मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेनं एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर संचालक असलेल्या मुंबै बँकेला रिझर्व्ह बँकेनं मोठा धक्का दिलाय. केवायसी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेनं मुंबै बँकेला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यावर मुंबै बँकेनं आपली बाजू मांडली. मात्र, रिझर्व्ह बँकेचं समाधान झालं नाही आणि मनी लाँड्रिंगंचं प्रकार झालं असल्याचं स्पष्ट झालं असून केवायसी निकषांचंही उल्लंघन झाल्याचं आढळून आलंय आणि त्यामुळेच तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close