गडकरींचा पुतळा पुन्हा बसवणार -प्रशांत जगताप

January 3, 2017 3:37 PM0 commentsViews:

prashant_jagtap403 जानेवारी : पुण्यात संभाजी ब्रिगेडनं फोडलेला राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभारणार असं आश्वासन पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिलंय. तर पुतळा फोडण्यांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिलंय.

पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराजांची नाटकातून बदनामी करण्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडनं पुतळा फोडलाय आणि मुळा मुठा नदीमध्ये फेकून दिला. संभाजी ब्रिगेडचे हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले यांनी पुतळा फोडत घोषणाबाजी केली.  राम गणेश गडकरी यांच्या मुंबईतल्या शिवसेना भवन समोर आणि ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृहात असलेल्या पुतळ्याला संरक्षण मिळणार का ?असा प्रश्न आता उपस्थित होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close