पोषक आहाराची ऐशी तैशी

January 3, 2017 11:00 AM0 commentsViews:

 

latur aahar - Copy

03 जानेवारी : जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहार या योजनेतून विद्यार्थ्यांसाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करतंय.मात्र गावखेड्यात आजही विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार तर सोडाच पण शासनाचा आलेला तांदूळ देखील मिळत नाहीय.

लातुरच्या औसा तालुक्यातल्या लामजुना शाळेमधला हा सगळा प्रकार आहे. आयबीएन लोकमतची टीम शाळेत माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळेतून पळ काढला.या शाळेत खेड्यापाड्यातले १३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी ९०० विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शासनाकडून पुरवला जातो.

मात्र शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पाटू यांच्या मर्जीशिवाय इथं पोषण आहार मिळत नाही.कधी तरी पोषण आहार शिजवला जातो.पण तोदेखील निकृष्ठ दर्जाचा.या शाळेचं किचन शेड देखील अत्यंत घाणीत आणि मोकाट जनावरांच्या सान्निध्यात असल्यानं खरोखर यालाच पोषण आहार म्हणायचा का,असा देखील प्रश्न निर्माण होतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close