काश्मीरमध्ये झेलमचं पात्र पडलं कोरडं

January 3, 2017 3:10 PM0 commentsViews:

jhelum-river_650x400_61483287249

03 जानेवारी : काश्मीरमध्ये गेल्या 40 वर्षांतला सगळ्यात मोठा कोरडा दुष्काळ पडलाय. झेलम नदीचं पात्र कोरडं पडल्यामुळे त्याचा परिणाम काश्मीरवर झालाय. दोन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झेलम नदीला पूर आला होता. पण आता हीच नदी पाण्याचे स्रोत आटल्यामुळे कोरडी पडलीय.

काश्मीरमध्ये सध्या गोठवणारी थंडी आहे. पण तरीही इथे अजून हिमवृष्टी झालेली नाही. गेल्या 4 दशकांत पहिल्यांदाच काश्मीरमध्ये अशी स्थिती निर्माण झालीय. हिमवृष्टी होत नसल्यामुळे इथल्या पर्यटनालाही याचा फटका बसलाय.

काश्मीरमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात 100 मिमी पाऊस पडतो. पण यावर्षी या काळात 3.6 मिमी पाऊस पडला. त्यामुळेही झेलमच पाणी आटलंय.

झेलमचं पात्र कोरडं पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालीय, ऊर्जानिर्मितीही घटलीय. त्याचबरोबर नदीच्या पात्रातून होणाऱ्या जलवाहतुकीवरही याचा परिणाम झालाय. कधी पुराचं संकट तर कधी नदी कोरडी पडणं या घटना हवामान बदलालाच परिणाम आहेत, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close