फळबाग लागवडीतून केली अर्थक्रांती

January 3, 2017 1:00 PM0 commentsViews:

03जानेवारी,प्रशांत आवटे : दुष्काळी भागात पारंपारिक पिकांना फाटा देत फळबाग लागवड करून गावात अर्थक्रांती झाल्याचा अनुभव सोलापूर जिल्ह्यात आला आहे.सीताफळ फळबाग व्यवस्थापनेच्या माध्यामतून बार्शी तालुक्यातल्या वाणेवाडी गावचा कायापालट झाला आहे.

हे आहे बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गाव.खडकाळ जमीन आणि त्यातच पारंपरिक पीकपद्धती आणि त्यातून मिळणारं जेमतेम उत्पन्न आणि उन्हाळाभर पाण्याचा टँकर.या गावाची हीच ओळख. पण आता हीच ओळख पुसली गेली आहे. अनंत गरदाडे यांच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी सीताफळाच्या सुपर गोल्डन,आणि हनुमान अशा जाती विकसित केल्या. त्यांनी फक्त त्यांच्या शेतात याची लागवड केली नाही तर अनेकांना त्याचं मोफत वाटपही केलं. या फळाला अतिशय कमी पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या या गावात अनेकांनी त्याची लागवड केली. याच सीताफळामुळे या गावातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अक्षरश: अर्थक्रांती झालीये.

जवळपास या गावात २५० एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड झाली आहे. त्यातील शासनाच्या रोजगार हमी योजनेतून १६० एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड करण्यात आली आहे. त्यातील १०० एकर क्षेत्रावरच फळ हे विक्रीसाठी मुंबई,पुणे इथल्या मार्केट मध्ये आकर्षक पॅकींग करून पाठवलं जातं. सीताफळांमुळे या गावात आज 2 ते 3 कोटी रुपयांची उलाढाल होतीये. पण नोटबंदीचा फटका या शेतकऱ्यांनाही बसला.

खडकाळ जमीन, दुष्काळी भाग असूनही योग्य नियोजन केलं तर दुष्काळ संपू शकतो, हेच या गावानं सिद्ध केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close