राम गणेश गडकरींचा पुतळा फोडणाऱ्यांना अटक

January 3, 2017 6:07 PM0 commentsViews:

briged_Aarest03 जानेवारी : पुण्याच्या संभाजी उद्यानामधील राम गणेश गडकरींचा पुतळा फोडल्याप्रकरणी संभाजी बिग्रेडच्या चार जणांना डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशीनंतर अटकेची कारवाई करण्यात आलीये.

सोमवारी मध्यरात्री संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांनी संभाजी उद्यानात घुसून राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला. गडकरींच्या ‘राजसंन्यास’ नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय. पुतळा फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या चौघाजणांचा हा  व्हिडिओ सोशल साईटवर फिरत होते. पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. अटकेच्या कारवाईनंतर आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close