सनातन साप्ताहिक वाचायला मिळावं, समीर गायकवाडची मागणी

January 3, 2017 6:34 PM0 commentsViews:

­­Sameer Gaikwad03 जानेवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुन्हा 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. याप्रकरणी संशयित आरोपी आणि सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडेला 21 तारखेला कोर्टात हजर करण्यात येईल. वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड या दोन्ही संशयित आरोपींना आज कोल्हापूर सत्र न्यायलायात हजर करण्यात आलं होतं.

वीरेंद्र तावडे हा सीबीआयच्या कोठडीत आहे आणि त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आलीय तर समीर गायकवाड कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. हे दोघेही सनातनचे साधक आहेत. आपल्याला सनातन प्रभात साप्ताहिक वाचायला मिळावं, अशी मागणी समीर गायकवाडने कोर्टात केलीय.

समीर गायकवाडवर आजही आरोप निश्चित होऊ शकले नाहीत. 21 जानेवारीला समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडेची एकत्रित सुनावणी होणार आहे. या खटल्यातले सरकारी वकील बदलण्यात आलेत. आता चंद्रकांत बुधले यांच्याऐवजी शिवाजी राणे हे नवे वकील असतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close