टीम इंडियामध्ये दलितांना आरक्षण द्या-रामदास आठवले

January 3, 2017 7:22 PM2 commentsViews:

ramdas_Athavale_#03 जानेवारी :  भारतीय क्रिकेट टीम बऱ्याच वेळा हरते. या टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर टीम इंडियामध्ये दलितांना कोटा असणं गरजेचं आहे, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी केलीये.

रामदास आठवले हे नेहमी आपल्या वक्तव्यं आणि कवितांमुळे चर्चेत असतात. पण सामाजिक न्याय विभागासारख्या जबाबदार पदावर असताना त्यांनी दलित कार्ड पुन्हा एकदा पुढं केलंय.

राज्यात आरक्षणासाठी वेगवेगळ्या समाजाचे मोर्चे निघतायत. यातच आता भारतीय टीममध्ये आरक्षणाची मागणी करून रामदास आठवलेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • http://www.amipatil.me Amit Patil

    चर्चेत nahi pan jokes madhe khup asatat.

  • Nik

    दलितांना आरक्षण दिले की काय होते याचे उत्तम उदाहरण आहेत आठवले साहेब. त्यामुळे त्यांचा सल्ला मूठभर मिठासहित घेतला जाईल हीच अपेक्षा…

close