बायको भेटल्यावर कार्टी आई-बापांना ढुसण्या मारतात,अजितदादांची टोलेबाजी

January 3, 2017 8:32 PM0 commentsViews:

03 जानेवारी : आज क्रांतिज्योति सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त देशभरात स्त्री कर्तुत्वाला सलाम केला जातोय. समाजाला खऱ्या अर्थान् समृद्ध करणारी मुलगी आपल्या पोटी नसल्याचं दुःख अनेकांना असत,त्यात राजकीय व्यक्तीही अपवाद नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आज आपल्याला मुलगी नसल्याची खंत व्यक्त केली.

ajit_pawar34पिंपरी चिंचवड इथ अजित पवारांनी बेटी बचाव ह्या अनोख्या समूहशिल्पाच लोकार्पण केलं. या कार्यक्रमात अजित पवारांनी मुलींचं आईवडिलांवर किती प्रेम असतं हे तर सांगितलंच शिवाय मुलं मात्र आईवडिलांशी कशी प्रतारणा करतात हेही खास त्यांच्या शैलीत सांगितलं.

मुलगी जेवढी आई वडिलांना प्रेम देत तेवढी कार्टी देत नाही. कार्टी म्हणजे मुलगा…त्याला बायको भेटली की तो बापालाही ढुसण्या मारतो आणि आईलाही ढुसण्या मारतो असं मिश्किलपणे अजित पवार म्हणाले. पवारांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसंच मुलगी मात्र सासरी गेली तरी साधा फोन जरी आला तर डोळ्यात पाणी येतं. आई-बापावर प्रेम करणं काय असतं ते मुलीकडून शिकावं असंही अजित पवार म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close