कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना करावी लागले उघड्यावरच आंघोळ !

January 3, 2017 9:29 PM0 commentsViews:

03 जानेवारी : थंडीच्या महिन्यात सकाळी सकाळी तुमच्या अंगावर गार पाणी टाकलं तर कसं होईल. पण आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या मतदारसंघातल्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना भल्या पहाटे गार पाण्यानं आंघोळ करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पालघर जिल्हयातील जव्हार हे मिनी महाबळेश्वर म्हणून ही संबोधल जातं. कारण येथे उन्हाळ्यात ही गारवा कायम असतो. तर आजच्या थंडीच्या दिवसात येथील गारवा केवढा असेल. जव्हारमध्ये या घडीला पाच ते दहा अंश सेल्सियसच्या आसपास तापमान आहे. एवढ्या थंडीत मुलांना थंड पाण्यानं आंघोळ करावी लागतेय.javahar34

पालघर जिल्हयात १९७२ पासून आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. माञ आजही या आश्रमशाळांची परिस्थिती वाईट आहे. पहाटे साडे सहा वाजता या विद्यार्थ्यांना या थंडीत थंड पाण्यानं आंघोळ करावी लागते. ती ही उघडयावर. मुलं थंड पाण्यातून आल्यावर उब मिळावी म्हणून शेकोटी करून, शरीरात गरमी ही आणण्याचा प्रयत्न करतात. पाण्यात उतरण्यासही थरकाप उठतो असतो. काही विद्यार्थी तर हात पाय धुवून दोन ते तीन दिवस आंघोळच करत नाही.

पालघरमधील बहुतेक आश्रमशाळेत अशीच अवस्था आहे. माञ विद्यार्थिनींना पहाटे पाच वाजता येवून, ओढयावर उघडयावर आंघोळ करावी लागते. पाच वाजता अंधार असल्याने आश्रमशाळेतील मुली उघडयावर आंघोळ करतात. शेजारी मुख्य रस्ता असल्याने वाहनांची ये-जा असते. त्यातच ही आंघोळ. मुलींना अक्षरश: लाज वाटते आंघोळ करताना.

या आश्रमशाळेत  मुख्याध्यापकांनी मुलं उघडयावर आंघोळ करत असल्याची बाब मान्य केली. माञ आपनं हे वरिष्ठांकडे बाब कळवली असून, आपले अधिकार तोकडे असल्याने सुविधा उपलब्ध करून देता येत नसल्याच मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे.

पालघरमधील आश्रमशाळेला सोलार सिस्टम दिलं आहे. माञ, ते धूळ खात पडल्याचा गौप्यस्फोट माजी आदिवासी राज्यमंञी राजेंद्र गावीत यांनी केला आहे. पालघर जिल्हयाचे पालकमंञी विष्णू सावरा हे याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसंच ते आदिवासी विकास मंञी ही आहेत. त्याच्याच प्रभागात अशी लाजीरवाणी गोष्ट चालत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close