5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, 11 मार्चला फैसला

January 4, 2017 1:10 PM0 commentsViews:

BRKING940_201701041216_940x355

04 जानेवारी : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये अखेर विधानसभा निवडणुकांचं  बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. जवळपास पुढचा महिनाभर निवडणूक प्रक्रिया चालणार असून 11 मार्चला एकाच दिवशी पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आजपासूनच या पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान करण्यात येणार आहे. पहिला टप्पा 11 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 15 फेब्रुवारी, तिसरा 19 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 4 मार्च आणि सातवा टप्पा 8 मार्चला होणार आहे. मणिपूरमध्ये 4 मार्च आणि 8 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होईल. पंजाब आणि गोवा या दोन राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर उत्तराखंड राज्यातही 15 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल.

पाच राज्यांमध्ये 690 जागासांठी या निवडणूका होणार आहेत. निवडणुकीत एकूण 16 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यासाठी 1 कोटी 85 लाख मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दिव्यांगासाठी मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल याची काळजी घेण्यात येईल तसंच महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येईल, असंही झैदी यांनी नमूद केलं आहे.

उत्तर प्रदेश – 7 टप्प्यांत मतदान

पहिला टप्पा – 11 फेब्रुवारी
दुसरा टप्पा – 15 फेब्रुवारी
तिसरा टप्पा – 19 फेब्रुवारी
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी
पाचवा टप्पा – 27 फेब्रुवारी
सहावा टप्पा – 4 मार्च
सातवा टप्पा – 8 मार्च

पंजाब – एका टप्प्यात मतदान

 4 फेब्रुवारी

 उत्तराखंड- एका टप्प्यात मतदान

15 फेब्रुवारी

मणिपूर – 2 टप्प्यांत मतदान

पहिला टप्पा – 4 मार्च
दुसरा टप्पा – 8 मार्च

गोवा – एका टप्प्यात मतदान

4 फेब्रुवारी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close