‘लव्ह अॅण्ड गाॅड’ची 20 वर्ष

January 4, 2017 12:08 PM0 commentsViews:

04 जानेवारी: आजच्या काळात एका अभिनेत्याचे दोन ते तीन चित्रपट एका वर्षात सहज रिलीज होतात. कारण सगळ्याच गोष्टी वेगवान झाल्या आहेत. मात्र असाही जमाना होता जेव्हा एका चित्रपटाला बनायला वर्षोनुवर्ष लागत. उदा.अमर कलाकृती ‘मुघल-ए-आझम’ला बनायला नऊ वर्ष लागली होती तर ‘पाकिजा’ बनायला चौदा वर्ष लागली . कहर म्हणजे एक चित्रपट असाही आहे ज्याला तयार व्हायला जवळपास 20 वर्ष लागली.

1960च्या दशकात आलेला ‘मुघल-ए-आझम’ चित्रपट सुपरहीट ठरला आणि त्याने भरपुर गल्ला जमवला. दिग्दर्शक आणि निर्माता आसिफने या जोरदार यशानंतर त्याच्या नवीन चित्रपटावर काम सुरु केलं. लैला आणि मजनू यांच्या अमर प्रेमकथेवर त्यांनी ‘लव अॅऩ्ड गॉड’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं.

हा त्यांचा पहिला रंगीत चित्रपट ठरला होता. त्यासाठी त्यांनी गुरुदत्त आणि निमी यांना साईनही करून घेतलं. अशाप्रकारे त्यांचे चित्रीकरण सुरू झालं. हळूहळू काम सुरु होतंच मात्र अचानक काही संकटं उभी राहायला लागली. सगळ्या कामांमध्ये अडथळे येऊ लागले.

10 ऑक्टोबर 1964 ला अचानक चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याचा मृत्यू झाला. या एवढ्या मोठ्या धक्क्यामुळे चित्रीकरण संपुर्णत: थांबवावं लागलं. त्यांच्या मृत्युनंतर आसिफनी संजीव कुमार यांना त्या भूमिकेसाठी साईन केलं आणि चित्रीकरण पुन्हा सुरू केलं.

इतकं सगळं कमी म्हणुन काय तर 1971ला सगळ्यात मोठा अडथळा आला. काही कारणाने स्वत: दिग्दर्शकाचाच मृत्यु झाला. यानंतर तर सर्वांनी चित्रपटाच्या अपेक्षाच सोडल्या होत्या. नंतर जवळपास 80च्या दशकात त्यांच्या पत्नीने त्यांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करण्याच ठरवलं.
एवढ्या सगऴ्या संकंटानंतर शेवटी 1986मध्ये हा चित्रपट रिलीज केला गेला. याच्या निर्मितीला जवळपास 20 वर्ष गेली.

गायक व संगीतकार नौशाद आणि रफी यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. मुख्य अभिनेत्री निमी हिचासुध्दा तो शेवटचा चित्रपट ठरला. तसंच स्वत: संजीव कुमारही हा चित्रपट पाहु नाही शकले. चित्रपट रिलीज होईपर्यंत ते या जगातून निघून गेले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close