पुण्यात बिल्डर कुरतडताहेत डोंगर

May 20, 2010 3:18 PM0 commentsViews: 2

प्राची कुलकर्णी, पुणे

20 मे

पुणे शहरातील अनेक टेकड्यांवर बांधकामे केल्यानंतर आता बिल्डरांची नजर पुण्याबाहेरच्या टेकड्यांवर वळली आहे. पुण्याजवळच्या मुगावडे इथे सह्याद्रीचा डोंगरच फोडण्याचे काम सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघडकीस आणले आहे.

पुण्याजवळच असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील हा डोंगर जेसीबी मशीन्स लावून फोडला जात आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आवाज उठवला. पर्यावरणाचा दाखला न घेता कमशिर्यल डेव्हपलमेंटच्या नावाखाली हे काम सुरू आहे.

तहसीलदारांनी या कामाच्या विरोधात नोटीस बजावली आहे. पण सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच हे काम सुरू असल्याचा दावा बिल्डरच्या कायदेशीर सल्लागारांनी केला.

याआधी पुणे जिल्ह्यात ऍम्बी व्हॅली, लवासासारखे प्रकल्प झाले. तेव्हाही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला होता. भरपूर गदारोळ झाला होता.

विकासाच्या नावाखाली शहराची फुफ्फुसे समजल्या जाणार्‍या टेकड्या आणि डोंगर फोडले जाणार असतील तर शहराच्या पर्यावणाचा र्‍हास व्हायला वेळ लागणार नाही.

close