मुंबईतले दोन तरुण हृषिकेशमधल्या नदीत बेपत्ता

January 4, 2017 1:46 PM0 commentsViews:

4

04 जानेवारी : उत्तराखंडला नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेले कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमधील दोन विद्यार्थी गंगेत बुडल्याची माहिती हाती आली आहे. हृषिकेशमध्ये वॉटर रॅपलिंग करताना ही दुर्घटना झाली असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांचा शोध सुरू होता.

देशभरातले 80 विद्यार्थी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हृषिकेशला गेले होते. त्यात मुंबईच्या ठाकूर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यापैकी विनय शेट्टी आणि करण जाधव हे दोघे गंगा नदीत बुडाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण असून मंगळवारी दिवसभर ठाकूर कॉलेजमध्ये शांततेचे वातावरण होते.

विनय आणि करण या दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले असून विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. मात्र 24तास उलटूनही अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close