‘त्या’ रात्री भररस्त्यात झालेला तरुणीचा विनयभंग सीसीटीव्हीत कैद

January 4, 2017 3:20 PM0 commentsViews:

04 जानेवारी :  आयटी सिटी म्हणून ओळखल जाणाऱ्या बेंगळुरू शहरात थर्टीफर्स्टच्या रात्री घडलेला धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहरातील एमजी रोडवर रात्री उशिरा काही तरुणींची खुलेआम छेड काढून त्यांच्याशी भररस्त्यात अश्लील चाळे करण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत स्पष्ट झालं असून पोलिसांनी आता त्याआधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

banglore footage

थर्टीफर्स्टच्या रात्री बेंगळुरू शहरात घडलेल्या छेडछाडीच्या घटनांवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी  पोलिसांचा शांतपणे तपास सुरूय, असं बंगळुरूचे पोलीस आयुक्त प्रवीण सूद यांनी म्हटलं आहे.

31 डिसेंबरच्या रात्री बंगळुरूत जमावानं अनेक महिलांचा विनयभंग केला. त्यांनी मारहाण आणि चोरीचाही प्रयत्न केला. सुदैवानं पोलीस तिथे पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला. पण 3 दिवस गुन्हा का दाखल केला नाही, हा मोठा सवाल आहे.

कहर म्हणजे 31 डिसेंबरला अशा गोष्टी होत राहतात, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close