पैसे नाहीत म्हणून लोकांनी फोडली बँक

January 4, 2017 4:36 PM0 commentsViews:

04 जानेवारी :  नोटाबंदीनंतर पंचावन्न दिवसांनंतरही बँकेतून पैसे मिळत नसल्यानं संतापलेल्या लोकांनी बुलडाण्यात स्टेट बँकेत तोडफोड केली.

नोटबंदीनंतर आता ५० पेक्षा जास्त दिवस झालेत. पण ग्रामीण भागात अजूनही लोकांना बँकेतून पैसे मिळतच नाहीयेत.  जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात अजूनही बँकेसमोर अशा रांगा लावून लोक उभं आहे. एकीकडे बँकेत पैसे संपतायेत तर दुसरीकडे एटीएममध्येही पैसे नाहीयेत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्टेट बँकेच्या शाखेच्या काचाच फोडल्यातच. अगदी शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थी, गृहीणी, म्हातारे कोतारे सगळेच तास न तास रांगा लावून उभे राहतात. पण पैसे मिळत नाहीयेत. आणि बँकेतले कर्मचारी, मॅनेजरसुद्धा नीट माहिती देत नाहीयेत. त्यामुळे नागरिक संतापतायेत.

buldhana_Atm4नियमाप्रमाणे पैसे मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी बँकेच्या काचा फोडल्या बँकेच्या नियमबाह्य कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी यामधून दिसून येत आहे. दुसरीकडे एटीएम सुद्धा रिकामी पडली असून नागरिक मोठ्या प्रमाणात बँकेसमोर गर्दी करत आहेत. बँकेतील ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा रोष पहावयास मिळत आहे. यावर मॅनेजर यांनी टोलवाटोलवी केली आहे.
शिवाय बँक कर्मचारी ग्राहकांना माहितीही देत नव्हते. त्यामुळं संतापाचा कडेलोट झालेल्या ग्राहकांनी बँकेत तोडफोड केली. यात बँकेच्या दर्शनी भागाचं थोडंफार नुकसान झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close