पाच राज्यात शिवसेना स्वबळावर लढणार !

January 4, 2017 7:26 PM0 commentsViews:

sena_up_election04 जानेवारी : उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या  5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय. शिवसेनेचे खासदार  अनंत गीतेंनी ही घोषणा केलीये.

5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आला आहे. गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोवा, पंजाबमध्ये 4 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला मतदान होईल तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

शिवसेनेनं या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय. पाच राज्यात स्वबळावर लढणार असं सेनेचे नेते अनंत गीते यांनी यांनी जाहीर केलंय. या पाच राज्यांत जर कोणी समविचारी पक्ष सोबत आला तर ठीक आहे नाहीतर आम्ही स्वत: लढू असं सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे. शिवसेना आता या राज्यांमध्ये आपली ताकद आजमावणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close