धोणीने कर्णधारपद सोडलं

January 4, 2017 9:49 PM0 commentsViews:

mahendra-singh-dhoni3-104 जानेवारी :टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम. एस. धोणीने वन डे आणि टी – 20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय  बीसीसीआयने पत्रक काढून जाहीर केलाय. धोणी इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी – 20 सीरिजमध्ये मात्र खेळणार आहे. 

या सीरिजसाठी टीमची निवड करण्यासाठी बीसीसीआयची निवड समितीची 6 जानेवारीला बैठक होतेय. धोणीनंतर आता टीम इंडियाचा कॅप्टन कोण असेल याचा निर्णय अजून झालेला नाही. पण टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीकडेच टीम इंडियाची धुरा जाण्याची शक्यता आहे.
धोणीने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला. यासोबतच त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी – 20 वर्ल्ड कप जिंकला. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा विजय झाला.
भारतीय क्रिकेटमध्ये धोणीने दिलेल्या योगदानाबद्दल बीसीसीआयने त्याचे आभार मानलेत.. धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने नवी उंची गाठली आणि घवघवीत यश मिळवलं, असंही बीसीसीआयने म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close