मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेसाठीच्या मोबदल्यात 50 हजारांची वाढ

January 5, 2017 9:30 AM0 commentsViews:

nagpur_mumbai express way

05 जानेवारी : मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेला जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारानं मोबदला वाढवून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. ठाणे भागात काही शेतकऱ्यांनी जमिनी द्यायला विरोध केलाय. त्यात शिवसेनेनं ह्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोबदल्याची रक्कम वाढवून दिलीय.

हा प्रकल्प जवळपास 46 हजार कोटींचा असून तो राज्यातल्या सर्वात मागास भागातून तो जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर मुंबई-नागपूरला आता जे 16 तास लागतात ते आठ तास लागतील. त्यामुळे महाराष्ट्राला बदलवणारा प्रकल्प पूर्ण होणं गरजेचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close