‘नक्षलवादी आपलीच माणसे’

May 20, 2010 5:49 PM0 commentsViews:

20 मे

नक्षलवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरून प्रमुख विरोधी पक्ष भाजपने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पण भाजपचे गुजरातचे फायरब्रँड मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मात्र याप्रकरणी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचे दिसते.

नक्षलवादी ही आपलीच माणसे आहेत. हा प्रश्न बंदुकीने नाही तर, चर्चेतूनच सुटू शकतो, असे मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे.

अलिगढमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी हे मत व्यक्त केले आहे. छत्तिसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी नक्षलवाद्यांवर थेट कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

तर केंद्र सरकार नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यास कुचराई करत असल्याचा असा आरोप भाजपने केला होता.

असे असताना मोदींनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

close